देवेंद्र फडणवीस खोटे व्हिडीओ शेअर करतायेत,सत्यता तपासली पाहिजे ; पृथ्वीराज चव्हाण

0

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हताश होऊन बनावट व्हिडिओ शेअर करत आहेत, असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुधारित नागरिकत्व विधेयकाला विरोध करणाऱ्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील (एएमयू) विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओवरुन चव्हाणांनी फडणवीसांना चांगलेच धारेवर धरलं.

राज्यातील भाजपाची सत्ता गेल्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निराश झाले आहेत. यामुळे फडणवीस हे बनावट व्हिडिओ शेअर करत आहेत, हे पाहून वाईट वाटतं. त्यांनी किंवा त्यांच्या कार्यालयाने व्हिडीओची सत्यता तपासली पाहिजे. माजी गृहमंत्री आणि जबाबदार विरोधीपक्ष नेते म्हणून त्यांनी द्वेषपूर्ण आणि संभाव्य खोटी माहिती पसरवण्यापासून स्वतःला रोखलं पाहिजे’ असं ट्वीट पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.