हुर्रे … दहावीच्या परीक्षेत मुलीचं अव्वल !

0

दहावीच्या परीक्षेचा निकाल ८९.४१ टक्के ; नाशिक विभागाचा ८७.४२ टक्के निकाल
पुणे : मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ८९.४१ आहे. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदाच्या निकालात ०.६७ टक्के इतकी वाढ झाली आहे.

यंदाच्या निकालात देखील मुलींनी बाजी मारली असून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनीचे प्रमाण ९१.९७ टक्के आहे तर, विद्यार्थ्यांचे प्रमाण ८७.२७ टक्के आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९६ टक्के आहे तर, कमी निकाल नागपूर विभागाचा ८५.९७ आहे, असे मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले. राज्यात ४०२८ शाळांचा निकाल १०० टक्के तर ३३ शाळांचा निकाल ० टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०१८मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.
निकालाची टक्केवारी

पुणे : ९२.०८,
नागपूर : ८५.९७,
औरंगाबाद : ८८.८१,
मुंबई : ९०.४१,
कोल्हापूर : ९३.८८,
अमरावती : ८६.४९,
नाशिक : ८७.४२,
लातूर : ८६.३०,
कोकण : ९६

Leave A Reply

Your email address will not be published.