हिंदू-मुस्लिम बांधवांनी रमजान ईद गुण्या गोविंदाने साजरी करावी : पोनि धनंजय येरुळे

0

भडगाव :- मुस्लिम बांधवांचा पवित्र सन रमजान ईद असल्याने भडगाव पोलिस स्टेशनतर्फे शहरातील जमादार वाडा येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेत सायंकाळी ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर पोलिस निरीक्षक धंनजय यरुळें, पोलिस उपनिरीक्षक आनंद पठारे, नगराध्यक्ष अतुल पाटील, उपनगराध्यक्ष डॉ. वसीम बेग मिर्झा, नगरसेवक अमोल नाना पाटील, राजेंद्र देशमुख, नगरसेविका योजना पाटील, शिवसेनेचे गणेश परदेशी, इमरान अली सय्यद, शशिकांत येवले, डॉ. मधुकरराव सोनवणे, काँग्रेसचे प्रदीप पवार, विजयकुमार देशमुख, इताबर खान, माजी पोलिसउपाधीक्षक वंजारी, आदी उपस्थित होते.

यावेळी पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे म्हणाले की, रमजान महिना हा पवित्र महिना असून हिंदू मुस्लिम बांधवांनी रमजान ईद उत्साहात साजरी करावी व भविष्यातील सण उत्सव गुण्या गोविंदाने एकोप्याने साजरी करून आनंद द्विगुणित करावा, असे यावेळी बोलताना सांगितले. या कार्यक्रम यशस्वितेसाठी

पो. कॉ. लक्ष्मण पाटील, ईश्र्वर पाटील, नितीन रावते, स्वप्निल चव्हाण, जगन्नाथ महाजन आदींनी  परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रविण महाजन (सर) यांनी केले तर आभार भडगाव पोलिस स्टेशनच्या वतीने मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.