उष्माघाताने पाचोऱ्यात पालिकेतील कर्मचाऱ्याचा मृत्यू

0

पाचोरा :- येथील पालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. संजय अमृत अहिरे (वय ४६, रा. मिलिंद हौसिंग सोसायटी) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी ३१ मे रोजी भरउन्हात सेवा बजावली होती तेव्हापासून त्यांना त्रास जाणवत होता. त्यांना चक्कर येऊन पूर्ण अंगाला घाम येत होता. १ जून रोजी सकाळी दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृत संजय यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे. ते पीपल्स बँकेचे कर्मचारी राजू अहिरे यांचे बंधू होत.

Leave A Reply

Your email address will not be published.