राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकास मारहाण करत लुटले

0

जळगाव :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला रविवारी रात्री ९ वाजता मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी लुटले. तसेच त्यांना मारहाण करत त्यांच्या हाताच्या बोटातील दोन सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील चेन व पाकिटातील दहा हजारांचा मुद्देमाल हिसकावत दोघा अनोळखींनी पलायन केले.

काव्यरत्नावली चौकापासून काही अंतरावर असलेल्या जाणता राजा जिम्नॉशियम शेजारी शासकीय बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नरेंद्र दहीवडे हे जेवण आटोपल्यानंतर त्यांच्या मोटारसायकल (क्र.एमएच १६, बीई ४४५८) ने आईस्क्रिम घेण्यासाठी गेले होते. आईस्क्रिम घेऊन घराकडे परतत असताना छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहाजवळील रस्त्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी काहीही कारण नसताना दहीवडे यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील एका तरुणाने सिमेंटचा पेव्हरब्लॉक त्यांच्या पाठीवर व मानेजवळ मारून त्यांना दुखापत केली. मारहाणीत दहीवडे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या व खिशातील १० हजार रुपये या तरुणांनी हिसकावून नेले.

Leave A Reply

Your email address will not be published.