हिंगोणे वाळू चोरीः पुन्हा झाला स्पॉट  पंचनामा

0
चार तास चालली तपासणीः प्रांताधिकारी, जिल्हा गौण खनिज अधिका-यांचीही उपस्थित
चाळीसगावः
हिंगोणे सीम येथील तितूर नदीपात्रातून होत असलेल्या वाळू चोरीचे प्रकरण ग्रामस्थांनी उघड करुन चोरटी वाहतूक करणा-यांना पकडूनही दिले. मात्र पंचनाम्यात गफलत करण्यात येऊन अल्प वाळू चोरी दाखवून चोरट्यांना अभय देण्याचा प्रयत्न होत असल्याने येथील नागरिकांनी आक्रमक पावित्रा घेतल्याने गुरुवारी पुन्हा पंचनामा करण्यात आला.  शुक्रवारी त्याचा अहवाल प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे. दरम्यान पुन्हा पंचनामा झाल्याने हे प्रकरण काय वळण घेते. याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.
२२ रोजी हिंगोणे सीम गावालगत तितूर नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघड केला होता. माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी याला अटक होऊन एका दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती. चौधरीला दुस-या दिवशी जामिनही मिळाला. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले असून वाळू चोरीचा पुन्हा पंचनामा करावा. अशी त्यांनी मागणी केली होती. वाळू चोरीचे पडसाद थेट मंत्रालयापर्यंत पोहचल्याने विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महसुल मंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणीही केली होती.
 हिंगोणेत गुरुवारी अधिका-यांचा लवाजमा
गुरुवारी दुपारी बारा वाजता प्रांताधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, जिल्हा गौण खनिज अधिकारी चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता के.बी.चव्हाण, भूमि अभिलेखा विभागाची टीम, सर्कल यांच्यासह तलाठी प्रविण महाजन हे हिंगोणेत दाखल झाले. त्यांनी नदीपात्रात वाळू उपसा झालेल्या जागेचे मोजमाप केले. लांबी, रुंदी आणि खोलीही मोजण्यात आली. दुपारी चार वाजेपर्यंत पंचनाम्याचे कामकाज सुरु होते.
1…वाळू उपश्यामुळे नदीपात्रात ५०० मी. लांब व ५०० मी. रुंदीचा सहा मीटर खोलीचा खड्डा पडला असून १५लाख घनफूट वाळूचा उपसा झाल्याचे म्हटले जात आहे. एकुण ३०० कोटी रुपयांची वाळू तस्करी असल्याचे पडसाद उमटले आहे. मात्र सुरुवातीच्या पंचनाम्यात ५२ घनफूट वाळू उपसा झाल्याचे म्हटल्याने हे प्रकरण चांगलेच तापले आहे. शुक्रवारी अहवाल सादर होणार आहे.
हिंगोणे येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी तितूर नदी मध्ये उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला

Leave A Reply

Your email address will not be published.