चोपडा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध 46 विषयांना मंजुरी

0

पालिका वृक्षारोपण सह नदी पात्रात जागोजागी माती बांध बांधणार!

चोपडा-
चोपडा नगरपरिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सर्वसाधारण सभा नुकतीच लोक नियुक्त नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे.सदर सभेत विषय पत्रिकेवर अनुक्रमे 308 ते 354असे एकूण 46 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.या सर्व विषयांना मंजुरी दिल्याची माहिती नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांनी दिली आहे.
सभेत उपस्थित विषयांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली यात सन 2019-2020 या आर्थिक वर्षा साठी ही सर्वसाधारण सभा पार पडली आहे. यावेळी सभागृहात उपनगराध्यक्षा सुरेखा माळी, गटनेता जीवन चौधरी , शिवसेना गटनेता महेश पवार,
यांच्यासह एकूण 30 सदस्य व मुख्याधिकारी अविनाश गांगोडे उपस्थित होते.
सभेतील 46 प्रमुख विषयांना देण्यात आली मंजुरी:- पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 2019-20 सालाकरिता शहरातील विविध रस्त्याकवरील गटारींना संरक्षण ढापे,बेचेस,घ्यावेत,पालिकेचा जलतरण तलावासाठी लागणारे क्लोरीन,व गैस सिलेंडर खरेदी करणे,नदी पात्रातील साफ सफाई,व काटेरी झुडपे काढणे,जागोजागी माती बांध टाकणे,शहरातील नव्याने पाईप गटारी करणे,त्यावर ढापे तयार करणे,गटारी,मुतार्‍या,साफसफाई चा ठेका पददतीने द्यावा,दोन्ही अमरधाम साठी लागणारे लाकूड खरेदी करण्याचा मक्ता देणे,पूर्ण शहराचा डी पीआर तयार करणे,येणार्‍या आर्थिक वर्षात कब्रस्तान साठी लागणार्‍या पाट्या यासाठी मक्ता दिला जाणार आहे. अतिक्रमण काढणे साठी येणार्‍या खर्चाला मंजुरी दिली आहे. शहरातील मुख्य रस्ते, रस्त्यावरील खड्डे, बुजवणे, बीबीएम करून कार्पेट काँक्रीटिकरण करणे, खराब झालेले दमदम दुरुस्त करणे,पाइपलाइनवर असणारे विविध साहित्य व रोड बनविणे,गावातील नव्याने पाईप लाईन,व जुन्या पाईपलाईन ची काम करणे, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन सावित्रीबाई फुले शॉपिंग सेंटरच्या एकूण 47 दुकानांच्या हस्तांतरण फी ठरविण्यात येणार आहे. येत्या वर्षभरासाठी लागणारे स्टेशनरी साहित्य, पोस्ट खर्चाला बैठकीत घेण्यात आला आहे. 2019- 20 या वर्षाकरिता पाणीपुरवठा विभागासाठी जल शुद्धीकरण करिता लागणारे ब्लिचिंग पावडर,एलम,खरेदी करणे या संदर्भात निर्णय सभेत घेतला गेला आहे. पाणीपुरवठा विभागासाठी शहरात विविध भागात पाईप लाईन टाकण्याचा विचार तसेच पाईपलाईन साठी लागणारे आवश्यक साहित्य खरेदीला मजुरी दिली आहे.
**शासनाच्या आदेशाप्रमाणे वृक्षारोपण करण्याचा विषयाला मंजुरी सभागृहात दिली आहे. नगरपरिषद मालकीचा हँडपंप दुरुस्ती करता हँडपंप वर काढणे, आवश्यक नवीन पाईप साहित्य टाकून दुरुस्थी करण्याचा विचार होऊन ती कामे हाती घेतली जाणार आहेत. वर्षभरासाठी स्वच्छता विभागासाठी गावात फवारणी करणे , जंतनाशक औषधी खरेदी करणे, गटारींचा घाळ तळापासून काढून तो गावाबाहेर वाहतूक करण्याबाबत वाषिक ठेका देणे,
मटन मार्केट व चिकन मार्केट मधील जगाचे भाडे निश्चिती करण करून जाहीर लिलाव देणेबाबत विचार करणे या विषयला मजुरी दिली आहे.व पालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी वाहन चालक यांच्यासाठी गणवेश खरेदी करणे, शहरातील मोकाट कुत्रे पकडून गावाबाहेर सोडणे यासाठी लागणारे खर्चाला मजुरी देण्यात आली आहे. पालिकेचा रुग्णालयासाठी येत्या वर्षात लागणारा औषध साठा खरेदी करण्याच्या देखील या ठिकाणी विचार एकमताने पास झाला आहे.त्याला मंजुरी देण्यात आली आहे .शहरातील सर्व मुतार्‍या साफसफाई नगरपालिकेचे इमारतीमध्ये शॉपिंग सेंटरची साफसफाई करणे ,पालिकेतील इमारत शौचालय बैठक व्यवस्था पुन्हा त्याच्या आतील व बाहेरील मोकळ्या जागेचे साफसफाई करणे याचा सुद्धा वार्षिक मक्ता देण्याचा विषयाला मंजुरी देण्यात आलेली आहे. घरपट्टीच्या बिलामध्ये घनकचरा संग्रह दर लागू करण्यात यावा याला मजुरी मिळाली आहे.विद्युत विभागाला लागणारे साहित्य खरेदी करण्याच्या संदर्भातला विचार मंजूर करण्यात आला आहे .वार्षिक योजना ,शासनाच्या विविध कामे करण्याचा ठराव करून घेणेकरिता आवश्यक कामाची निवड करणे, शहरातील विविध विकास कामांचे नकाशे, स्टील, डिजाइन ,तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता करणे ,कामाचे मोजमाप करून वास्तुविशारद सल्लागार, अभियंता ,यांची नगरपरिषदेच्या पॅनल नेमणूक करणे हा देखील ठराव पास करण्यात आला आहे .पालिकेच्या विविध विषयांमध्ये कोर्ट खटला चालवणे त्यासाठी लागणारा खर्च ला देखील या ठिकाणी मंजूर झाली आहे .सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत विकास कामाची निवड करणे चोपडा शहराच्या निर्मितीसाठी भावसार करण्याच्या कामाला अभियंत्याची नेमणूक करणे, या महत्वाच्या विषयांना सभेत मजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी दिली आहे.
**वादग्रस्त मुख्याधिकारी म्हणून बबन तडवी याची थेट मंत्रालय स्थरारून बदली झाल्याने त्याच्या जागेवर नव्याने आलेले मुख्यधिकारी अविनाश गांगोडे याची ही चोपडा नगरपालिकेत पहिलीच सर्वसाधारण सभा होती.आणि ती त्यांनी सत्ताधारी व विरोधक यांना एकत्रित करून खेळीमेळीचे वातावरणात सभा यशस्वी पणे पार पाडली आहे.दिव्य मराठी ने सभेत काय महत्वाचे निर्णय झाले असे विचारले असता त्यांनी सांगितले की सभा शांततेत पार पडली हा महत्वाचे आहे असे मिश्कीलपणे बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.