नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांचे वडील हिमांशु पांड्या यांचं आज, शनिवारी सकाळी कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं. एएनआयनं याबाबतंच वृत्त प्रकाशित केलं आहे.
दरम्यान, वडिलांच्या निधनांची माहिती मिळताच
बडोद्याचा कर्णधार क्रृणाल पांड्यानं बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. यंदाच्या सत्रात तीन सामन्यात क्रृणालने बडोद्याचं संघाचं नेतृत्व केलं.