गाडगेबाबांच्या एकशे सोळा वर्षाच्या अन्न वस्त्र दानाच्या परंपरेला खंड !

0

कोरोणा का च्या प्रभावामुळे ऋणमोचन ची यात्रा रद्द !

अमरावती (प्रतिनिधी) : आंधळ्या-पांगळ्या , कुष्ठरोगी, वृद्ध, निराधार व दीनदुबळ्यांसाठी कर्मयोगी गाडगेबाबा यांनी एकशे पंधरा वर्षांपूर्वी सुरू केलेले सदावर्त यंदा प्रथमच खंडीत होणार आहे , कोरोणा च्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील व दर्यापुर तालुक्यातील ऋणमोचन यात्रा रद्द झाल्यामुळे दरवर्षी होणारा अन्न वस्त्र दानाचा कार्यक्रम देखील रद्द होणार आहे.

दर्यापूर ,भातकुली, मुर्तीजापुर या तीन तालुक्याच्या सीमेवरिल. अर्धचंद्राकृती आकाराच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या काठावर वसलेले श्री क्षेत्र ऋणमोचन येथे मुदगलेश्वराचे ( महादेव ) देवस्थान असून कर्मयोगी गाडगेबाबा यांनी 1907 सालि अंध- अपंग व दीनदुबळ्यांसाठी यात्रेदरम्यान सदावर्ता ची मुहूर्तमेढ रोवली होती . त्यांच्या पश्चात ही राज्यातील अनेक दान दात्यांच्या मदतीने दादासाहेब देशमुख यांनी ही परंपरा सुरु ठेवली. या सदावर्ताला वर्षाला सुमारे 115 वर्षे पूर्ण झाले आहे .
पूर्वीच्या काळी ऋणमोचन यात्रेदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात घाण व्हायची गाडगेबाबांनी ती स्वतः उचलून मानवजातीला स्वच्छतेचा धडा त्यावेळेस शिकविला. त्यांनी त्यांच्या अनेक कार्याचा येथेच शुभारंभ करून अनिष्ट चालीरीती व परंपरांना आळा घातला. 1908 साली गाडगेबाबांनी सामाजिक बांधिलकी पोटि लोकसहभागातून येथे पहिला घाट बांधला. त्यानंतर लोकवर्गणीतून आणखी चार घाट बांधले . खऱ्या अर्थाने लोकवर्गणीची संकल्पना त्यांनी त्या वेळेस दिली. याशिवाय परीट बांधवांसाठी 1914 सालि पहिली धर्मशाळा सुद्धा येथे बांधली त्यामुळे हे तीर्थक्षेत्र त्यांची कर्मभूमी ठरली आहेे.

श्री क्षेत्र ऋणमोचन येथे यात्रेदरम्यान पौष महिन्यातील चौथ्या किंवा शेवटच्या रविवारी आमला येथील गाडगेबाबा लक्ष्मीनारायण संस्थांच्या पुढाकाराने अन्न – वस्त्र दानाचा सोहळा आयोजित केला जातो . गाडगेबाबा मिशनचे बापूसाहेब देशमुख दरवर्षी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन करत असतात. त्यावेळी त्यांच्या मुखातून सतत गोपाला – गोपाला देवकीनंदन – गोपाला हे गाडगे बाबांचे आवडते भजन होताना दिसून येते.त्यांच्या भजनात उपस्थित सर्व अंध, अपंग, वृद्ध, निराधार, दीनदुबळ्या सह भाविक भक्त मोठ्या उत्साहात हात उंचावून भजन गातात. शिस्तप्रिय असा हा विलोभनीय व अविस्मरणीय सोहळा सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो मात्र यावर्षी कोरोणाच्या प्रभावामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागातील शेकडो अंध अपंग वृद्ध निराधार ऋणमोचन यात्रेत एकत्र येऊन ह्या कार्यक्रमात सहभागी होत असतात परंतु यावर्षी कोरोणाच्या प्रभावामुळे ऋणमोचन यात्रा रद्द झाल्याने अन्न वस्त्र दानाचा कार्यक्रम देखील रद्द झाला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भाविकात कमालीची नाराजी पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.