आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार लसीकरण अभियानाचे उद्घाटन

0

पुणे – जगातील करोनासोबतचा सर्वात मोठा लढा आजपासून सुरू होत आहे. आघाडीच्या करोना योद्धयांची लसीकरण मोहीम आजपसून सुरू होत आहे. सुरवातीच्या टप्प्यात तीन कोटी जणांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिन या दोन लसी देण्यात येणार आहेत. त्यानंतर प्राधान्य गटांचे लसीकरण करण्यात येईल.

भारतात एक कोटी पाच लाख 27 हजार जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर एक लाख 52 हजार जण मरण पावले आहेत. देशभरातील तीन हजार सहा लसीकरण केंद्रावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने मार्गदर्शन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी या मोहिमेचे उद्‌घाटन करतील.

प्राधान्य गटामध्ये आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, लष्कराचे जवान आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचे कार्यकर्ते यांचा समावेश आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 जणांना लस मिळणार आहे. 130 कोटी लोकसंख्या असणाऱ्या या देशात लसीकरण राबवण्यासाठी निवडणुकीच्या अनुभवाची मदत घेण्यात येणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.