गाडी चालवताय : मग जाणून घ्या आजचा पेट्रोल – डिझेलचा भाव

0

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. दोन्ही इंधन दर जैसे थेच ठेवले आहेत. पेट्रोल आणि डिझेल मुंबई आणि दिल्लीत उच्चांकी पातळीवर कायम आहेत.

पेट्रोल आणि डिझेलमध्ये चालू महिन्यात चार वेळा दरवाढ झाली आहे. ज्यात पेट्रोल एक रुपया आणि डिझेलसुद्धा एक रुपयाने महागले आहे. कोव्हिड-१९ संसर्गाच्या चिंताजनक वाढीमुळे तसेच ब्रिटन, चीन आणि जर्मनीसह काही प्रमुख अर्थव्यवस्थांवर निर्बंध लादल्याने कच्च्या तेलाच्या मागणीवर परिणाम झाला आहे.

मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९१.३२ रुपये आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८१.६० रुपये आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८४.७० रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७४.८८ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८७.४० रुपये असून डिझेल ७०.१९ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८६.१५ रुपये असून डिझेल ७८.४७ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८७.५६ रुपये असून डिझेलचा भाव ७८.४० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.