हर्षवर्धन जाधव आणि पंकजा मुंडेंच्या मामाचा मनसे प्रवेश

0

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन आणि कन्नडचे शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘कृष्णकुंज’वर प्रकाश महाजन आणि हर्षवर्धन जाधव यांनी मनसेत अधिकृत प्रवेश केला आहे.

त्यांच्यासोबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे निष्ठावंत व कट्टर शिवसैनिक सुहास दशरथे यांनीही मनसेची वाट धरली आहे. दशरथे यांचा प्रवेश शिवसेनेसाठी धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही मनसेत प्रवेश केला आहे. प्रकाश महाजन हे. भाजपचे दिवंगत दिग्गज नेते प्रमोद महाजन यांचे बंधू आहेत.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला 5 कोटींची ऑफर दिली, राज ठाकरे हे आपल्याला न्याय देऊ शकत नाही, उद्धव ठाकरे निष्क्रिय आहेत असे अनेक आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केले आहेत. आता तर हर्षवर्धन जाधव यांनी स्वतःचे सासरे रावसाहेब दानवेंवरच गंभीर आरोप केले. माझ्या बायकोला हाताशी धरुन रावसाहेब दानवे माझं राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.