पाणीपुरवठाची १०० कोटींची वितरण व्यवस्था करण्यासाठी प्रयत्नशील ; ना.गुलाबराव पाटील

0

कपटी मीत्रापेक्षा दिलदार शत्रू बरा  ; जळगाव ग्रामीण तर्फे भव्य नागरी सत्कार

धरणगाव (प्रतिनिधी) : जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मतदारांच्या आशीर्वादाने मला पहिल्यांदा राज्यमंत्री व आता कॅबिनेट मंत्रीपदासह जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले असून या काळात मी जळगाव येथील समांतर रस्ते करण्यासाठी कटिबद्ध राहील तसेच जळगांव जिल्ह्यातील केळीला फळचा दर्जा मिळवून देणार,जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांना जास्तीत जास्त निधी मिळवून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भव्य नागरी सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केला. यावेळी त्यांनी धरणगाव शहरासाठी प्रलंबीत असलेल्या अंतर्गत पाईप लाईन कामासाठी सहा महिन्याच्या आत शंभर कोटी रुपये मंजूर करणार असल्याची ग्वाही दिलीतसेच कोणतीही राजकीय पार्श्वभूमीवनसताना कॅबिनेट मंत्री झालो.

प्रास्तविक शिवसेना ता.प्र.गजानन पाटील यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संपर्क प्रमूख संजय सावंत, आ.किशोर पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी.पाटील, शिवसेना जिल्हा प्रमूख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, महिला जिल्हा प्रमूख महानंदा पाटील, यांनी आपल्या भाषणातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखा जोखा मांडून बीनेट मंत्रीपदाचा लाभ जिल्ह्यासह जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचा विकास, सिंचन, उद्योग चा अनुशेष काढण्यासाठी ना.पाटील यांनी करावा अश्या अपेक्षा व्यक्त केली.

जळगाव ग्रामीण मतदार संघातर्फे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच विविध सामाजिक , राजकीय, शैक्षणिक संस्थातर्फे मंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोबत  शहर  लोकनियुक्त नगराध्यक्ष  निलेश सुरेश चौधरी, धरणगाव प स सभापती मुकुंद नन्नवरे,  उपसभापती शारदाताई प्रेमराज पाटील, तसेच जळगांव प स सभापती नंदलाल पाटील, उपसभापती संगिता चिंचोरे या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल सत्कार सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे ,माजी महापौर विष्णू भंगांळे, जळगाव महानगर प्रमूख शरद तायडे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, धानोरा सरपंच भगवान महाजन, उद्योजक जीवनसिंह बयस, सेनेच्या माजी नगराध्यक्ष उषा वाघ, राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा पुष्पा महाजन, उपनगराध्यक्षा अंजली विसावे, नगरसेविका कीर्ती मराठे, उपजिल्हाप्रमूख पी.एम,पाटील, चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, वि.का.चे चेअरमन सुभाष महाजन, प्रेमराज पाटील, नुतन सोसायटीचे चेअरमन भगवान महाजन, शहर प्रमूख राजेंद्र महाजन, नगरसेवक पप्पू भावे, वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, विलास महाजन, सुरेश महाजन, बापू पारेराव, विजय महाजन, काँग्रेस चे अध्यक्ष राजेंद्र न्हायदे ,बंटी पवार यांच्यासह शिवसेना ,राष्ट्रवादी ,काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांनी केले.

माजी नगराध्यक्ष स्व.सलीम पटेल यांचे स्मरण

भाषणाच्या सुरुवातीलाच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी नगराध्यक्ष स्व. सलीम पटेल यांचे स्मरण केले.व ७ फेब्रुवारी हा दिवस  त्यांचा वाढदिवस शिवसेना उत्साहाने साजरा करायचो.पण आज ते नाही मात्र त्यांचा आत्मा आपल्या अवती-भोवती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्यामुळे वातावरण भावनिक झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.