हद्दपार असतांनाही शहरात फिरणाऱ्या आरोपीस अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार असतांनाही जळगाव शहरातील शनिपेठ भागात बालाजी मंदिर रस्त्यावर फिरतांना मिळून आलेल्या एका गुन्हेगाराला शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या आदेशानुसार शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक बळीराम हिरे, पोलीस उपनिरिक्षक सुरेश सपकाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल परीस जाधव, गिरीश पाटील, राहूल घेटे, राहूल पाटील यांच्या पथकातर्फे मंगळवार, ३१ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान बालाजी मंदिराजवळ रस्त्यावर सागर उर्फ झंपर्‍या आनंदा सपकाळे (वय २४, रा. कोळीपेठ) हा हद्दपार आरोपी मिळून आला. त्याच्याकडे कुठलीही परवानगी नसल्याचे चौकशीत मिळून आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहूल घेटे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी सागर उर्फ झंपर्‍या याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.