पारोळा तालुक्यातील बोरी धरणाचे पंधरा दरवाजे उघडले

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्प हा शंभर टक्के भरल्याने या धरणाचे १५ दरवाजे सकाळी चार च्या सुमारास २६७,१९ मि,ने उघडण्यात आले,एकुण जिवंत साठा हा १००℅ झाला असल्याची माहिती वि,एम,पाटील यांनी दिली आहे,सदर मोठ्या प्रमाणात नदीत विसर्ग होत असल्याने व त्यात तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने बोरी नदीला महापुरु आल्या सदृश्य परिस्थिती दिसत आहे,बोरी दोन्ही काठ भरुन वाहात आहे, यामुळे बोरी धरणाच्या खालील भागातील नदी काठच्या गावा मधील नागरिकांना खबरदारी चा इशारा देण्यात आला आहे.

नदी पात्रामध्ये कोणीही जाऊ नये अथवा आपली गुरेढोरे नेऊ नये जिवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी,असे आवाहान कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव याच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

पारोळा तालुक्यात काल दि,३१ रोजी मुसळदार पाऊस झाल्याने तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहु लागले आहेत रात्री तालुक्यात सर्वीकडे जोरदार पाऊस झाले असल्याची माहिती मिळत आहे.

आज आढावा बैठकचे आयोजन

पारोळा तालुक्यातील बोरी नदी काठच्या सर्व गावातील तलाठी, पोलीस पाटील, सरपंच व ग्रामसेवक यांची आज दि,१ बुधवार रोजी आढावा बैठक मान. प्रांत साहेब, एरंडोल यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ३ वाजता पारोळा तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व संबंधितांनी न चुकता वेळेवर बैठकीसाठी हजर राहावे. आवाहन पारोळा तहसिलदार अनिल गंवादे यांनी केले आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.