‘हतनूर’चे आवर्तन सोडल्याने दिलासा

0

भुसावळ :– हतनूर धरणातून शहरासह रेल्वे, दीपनगर औष्णिक केंद्रासाठी गुरुवारी आवर्तन सोडण्यात आले. चार दिवस एक हजार डे क्युसेस व पाचव्या दिवशी ४०० डे क्युसेस या प्रमाणे पाच दिवसांत १०.७८ दलघमी पाण्याचे आवर्तन मिळणार आहे. साधारणपणे ५ जूनपर्यंत आवर्तन तापी बंधाऱ्यात पोहोचेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्याने तळ गाठला आहे. तर रेल्वेच्या अप्पर डॅममधून काही प्रमाणात पाणी मिळाल्याने दिवसभरातून तीन ते चार तास उपसा होत आहे. येत्या दोन दिवसांत हा साठा संपून शहरातील पाणीपुरवठा योजना ठप्प होणार आहे. सध्या केवळ ताशी ४ लाख लिटर पाण्याची उचल होत आहे. या अल्प उचलमधून काही अंशी शहराची तहान भागवली जाते. शहरातील दररोजची किमान २ कोटी ४० लाख लिटर पाण्याची गरज पाहता सध्या होत असलेली उचल शहराची तहान भागवू शकत नाही. पालिकेने पाटबंधारे विभागासह जिल्हाधिकाऱ्यांना पंधरवड्यापूर्वीच आवर्तनासाठी पत्रव्यवहार केला होता. अखेर गुरुवारी (दि.३०) हतनूर धरणातून एक हजार डे क्युसेसने आवर्तन सोडण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.