चिनावल परिसरात नुकसानीच्या पचनाम्याना वेग

0

चिनावल ता.रावेर :– दि 30 मे रोजी चिनावल सावखेडा, रोझोदा, वडगाव, कोचूर या गावांमध्ये तसेच शेती शहरांमध्ये घरांची झालेली पडझड तसेच केळी बागांचे झालेल्या मोठ्या प्रमाणात नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम दि 31 मे रोजी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर सुरू करून लवकरात लवकर हे 15 मी पूर्ण होतील असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.

चिनावल शिवारात 70 ते 80 सावखेडा शिवारात 40 ते 50 रोजा शिवारात तीस ते पस्तीस केळी उत्पादक शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचा पंचनामा चिनावल सावखेडा रोझोदा येथील तलाठी मंडळ अधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन केळी खोडांचे पाणी करून पंचनामे केले. नुकसानीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने अजून एक ते दोन दिवस हे पंचनामे करायला वेळ लागणार आहे. आजमितीस केलेल्या पंचनाम्याची व नुकसानाची आकडेवारी काढण्यास उशीर होणार असल्याने एकत्रितरीत्या ही आकडेवारी महसूल विभागातर्फे जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान सावखेडा येथील चार घरांचे रोज येथील सात घरांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे बाकी आहे. त्या त्वरित करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने केळी उत्पादकांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केळी उत्पादकाकडून होत आहे. आजचे पंचनामे रावेर तहसीलदार उषा राणे देवगुंडे, मंडळ अधिकारी संदीप जयस्वाल, चिनावल तलाठी उमेश बाभुळकर, तलाठी युटी महाजन, फिरोज तडवी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात जाऊन पंचनामे केले. दरम्यान वरिष्ठ अधिकारी या पंचनाम्यावर व नुकसान भरपाईचे जातीने लक्ष ठेवत परिसरात तळ ठोकून आहेत,

Leave A Reply

Your email address will not be published.