स्टेट बँकेच्या बोदवड शाखेतून ७७ हजारांची रोकड लंपास : चोरटा सीसीटीव्हीत कैद

0
बोदवड- शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खंडेलवाल पेट्रोल पंपाच्या सीसी खात्यात भरणा रक्कम जमा करण्यासाठी गेलेल्या पेट्रोल पंप मॅनेजरच्या हातातून ७७ हजार रुपये घेऊन चोरटा पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
  याबाबत अधिक असे कि, शहरातील खंडेलवाल पेट्रोल पंपाच्या सीसी खात्यात पेंट्रोल पंप मॅनेजर मनोज उर्फ (ज्वाला)सज्जनसिंग राजपुत (वय 34)
रा.जुनी पोस्ट गल्ली प्रभाग क्रं.२ बोदवड हा युवक मलकापूर चौफुली जवळील गौरी शंकर कॉम्प्लेक्स मधील स्टेट बँक ऑफ इंडिया बोदवड शाखेत पेंट्रोल पंपाच्या सीसी खात्यात रक्कम जमा करण्यासाठी गेला होता.यावेळी त्यावर पाळत ठेवून असलेल्या एका अज्ञात चोरट्याने तो स्लिप भरत असताना काऊंटर  क्र.2 येथून ७७ हजार रूपयांनी भरलेली रकमेची कापडी पिशवी हिसकावून पळ काढला असून चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
याबाबत मनोज राजपुत यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीसात भा.द.वी.कलम 379 प्रमाणे अज्ञात चोरट्या विरूद्ध चोरीला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक सुनील खरे यांच्या आदेशानुसार पुढिल तपास पो.हे.कॉ.कालिचरण बि-हाडे करीत आहेत.
  शहरातील बसस्थानक तसेच विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात यापूर्वीही ग्राहकाचे,प्रवाशांचे पैसे चोरण्याच्या घटना घडल्या आहेत.एकाही घटनेचा अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही.याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बँकेत, बसस्थानकावर चोरी करणाऱ्या या अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.