सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ ; जाणून घ्या दर

0

मुंबई : लग्नसराईच्या हंगामात मागणी वाढल्याने बुधवारी सोन्याच्या भावात मोठी उसळी दिसून आली. सराफा बाजारात सोन्याचा भाव ४६२ रुपयांनी वाढला. दिल्लीत सोने प्रति दहा ग्रॅमला ४२ हजार ३३९ रुपयांवर गेला. चांदीच्या दरात प्रति किलो १०४७ रुपयांची वाढ झाली. चांदीचा भाव ४७ हजार ६०५ रुपयांपर्यंत वाढला आहे.

याआधी सोने प्रति दहा ग्रॅमला ४१ हजार ८७७ रुपयांवर बंद झाले होते. चांदीच्या दरात प्रति किलो १०४७ रुपयांची वाढ झाली. आज चांदीचा भाव ४७६०५ रुपयांपर्यंत वाढला. जागतिक कमॉडिटी बाजारात सोने तेजीत असल्याने त्याचे पडसाद आज स्थानिक सराफा बाजारावर उमटले. लग्नसराईची खरेदी सुरु झाली असून सोन्याची मागणी वाढली आहे. यामुळे सोन्याच्या भावात आज मोठी उसळी दिसून आल्याचे ‘एचडीएफसी सिक्युरिटीज’चे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.