सोने- चांदीच्या भावात घसरण ; जाणून घ्या आजचे नवे दर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या  काही आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात  सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. मात्र मागील तीन दिवस सोन्याचा भाव जैसे थे दिसत आहे. मात्र, त्यामध्ये आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज सोन्याच्या किंमतीत 210 रुपयांची घट झाली आहे. याचबरोबर चांदीच्या किंमतीत देखील घट झाली आहे. आज चांदीच्या दरात 400 रुपयांची घसरण झाली आहे. तर सोन्याचा दर सध्या 47,660 रुपये तर, चांदीची किंमत 67,100 रुपये पर्यंत पोहचली आहे. मागच्या आठवड्याचा विचार करता सोन्याच्या भावात  घसरण आणि स्थिरता दिसून येते.

21 जुलैला 180, 22 जुलै 220, आणि 23 जुलैला 30 रुपयांची घट झाल्यानंतर पुढचे 3 दिवस सोन्याचा भाव स्थिर पाहायला मिळाला. नंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. दरम्यान, गतवर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दराने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यात आता जवळजवळ 8 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तसेच, मागील महिन्यात, 1 जून रोजी चांदीचा भाव  हा 72,600 रुपये इतका होता. त्यानंतर किंमतीत घट होऊन ती 70 हजारांच्या आत आलीय.

या दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झालीय. आणि डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला आहे. म्हणून सोन्याच्या दरात वारंवार घट होत आहे. मागील 2 महिन्यात सोन्याच्या किमतीत  घसरण झाली आहे. मात्र, आगामी काळात भाव वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

मुंबई आणि पुण्यातील सोन्याचा भाव 

24 कॅरेट सोन्याचा दर : 47,660 रुपये

22 कॅरेट सोन्याचा दर : 46,660 रुपये

चांदीची किंमत – एक किलो प्रमाणे : 67,100 रुपये

Leave A Reply

Your email address will not be published.