सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण ; जाणून घ्या आजचा दर

0

मुंबई : कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात नफावसुली सुरु आहे. एकीकडे अमेरिकेत मत मोजणी निर्णायक टप्प्यावर आली आहे. तर करोनाची दुसरी लाट युरोपात हाहाकार माजवत आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये बुधवारी सोन्याच्या दरात ३६२ रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५१२३६ रुपये आहे. चांदीच्या किमतीत देखील १५३६ रुपयांची घसरण झाली असून एक किलोचा भाव ६११४९ रुपये झाला आहे.

goodreturns.in या वेबसाईटनुसार बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९९६० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ५०९६० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९३१० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५२७९० रुपये आहे. कोलकात्यात ग्राहकांना २२ कॅरेट सोने खरेदीसाठी ४९७६० रुपये मोजावे लागत आहेत. तर २४ कॅरेटचा भाव ५२९६० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोने प्रती १० ग्रॅमसाठी ४७७१० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२०४० रुपये आहे. सोमवारी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली होती. तर मंगळवारी घसरण झाली होती.

आज अमेरिकेत मत मोजणीला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी स्पॉट गोल्डच्या दरात किरकोळ बदल झाला. स्पॉट गोल्डचा भाव प्रती औंस १८९४ डॉलरवर आहे. चांदीचा भाव प्रती औंस २४ डॉलर आहे. अमेरिका राष्ट्राध्यक्ष मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात पिछाडीवर असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मुंसडी मारली आहे. बायडन यांच्यापेक्षा जवळपास शंभरहून अधिक इलेक्टोरल मतांनी पिछाडीवर असलेल्या ट्रम्प यांच्याकडे आता २०० हून अधिक मते झाली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.