ग्रीन फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय वृक्षमित्र पुरस्कार डॉ. वाल्मिक अहिरे यांना जाहीर

0

भातखंडे (प्रतिनिधी) डॉ. वाल्मीक हिरामण अहिरे हे एक साहित्यिक, समीक्षक, लेखक असून त्यांचा झिरपा, करपा व रापीनी धार हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत साहित्यिक कार्याबरोबर त्यांनी जीवनात दरवर्षी कमीत कमी एक तरी झाड लावण्याचा संकल्प केलेला आहे. त्यानुसार त्यांनी अनेक ठिकाणी वडाची,निंब, पिंपळ,चिंच इ. रोपे लावलेले आहेत. ते वडजी तालुका भडगाव येथील रहिवासी असून जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कन्या शाळानं१ पाचोरा येथे कार्यरत आहेत.

त्यांच्या निसर्गा विषयी असलेल्या कार्य पाहून दहा वर्षापूर्वी निसर्ग मित्र समिती धुळे यांनी त्यांचा “निसर्ग मित्र” पुरस्कार देऊन गौरव देखील केलेला आहे. फटाकेमुक्त दिवाळी, कचरा होळी असे विविध उपक्रम ते राबवत असतात. विद्यार्थ्यांच्या मार्फत देखील झाडे लावा झाडे जगवा हा शासनाचा प्रकल्पही राबवत असतात. आतापर्यंत त्यांनी ज्या गावाला नोकरी केली तिथे वडाची झाडे लावलेली डौलाने डोलताना दिसतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत ग्रीन फाउंडेशन पुणे यांनी त्यांना राज्यस्तरीय “वृक्षमित्र” पुरस्कार जाहीर केला व दिनांक २५ आँक्टोबर २०२० रोजी कोरोना काळात ऑनलाइन पद्धतीने त्यांना तो पुरस्कार देण्यात आला.

त्यांच्या परिसरामध्ये सर्वदूर कौतुक होत आहे साहित्य क्षेत्रातील त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत समाज प्रबोधन करण्यास करणे, हागणदारी मुक्त गाव, करोना काळातील प्रबोधन, माझे कुटुंब माझी जबाबदारी, स्वच्छता अभियान या विविध उपक्रमात ते स्वतःहून भाग घेतात व समाज प्रबोधन करतात. शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, केंद्रप्रमुख आर.डी.पाटील पत्रकार बी एन पाटील व शिक्षक स्टाँपने त्यांचा यथोचित सत्कार केला असून भडगाव व पाचोरा परिसरात त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.