सोने-चांदीच्या दरात घसरण ; सोन्याचा भाव ५० हजारांखाली

0

मुंबई : मागील काही दिवस सोने आणि चांदीच्या दरात सुरु असलेली घसरण गुरुवारी देखील कायम आहे. सध्या मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने २४ रुपयांनी कमी झाले असून त्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५१७५५ रुपये झाला आहे. चांदीचा भाव १०९ रुपयांनी कमी झाला असून तो एक किलोला ६७४२० रुपये आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांतील घसरणीमुळे सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५० हजारांखाली आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याची किंमत 56,200 रुपये होती, जी वरच्या पातळीवरून घसरून प्रति 10 ग्रॅम 51,000 रुपये झाली आहे. त्याचबरोबर चांदीही प्रति किलो 13,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्याचे दर 78,000 रुपयांवरून 65,000 रुपयांवर आले आहेत.

goodreturns या वेबसाईटनुसार आज गुरुवारी दिल्लीत २२ कॅरेट सोने ४९८६० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५४३९० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोने ५०१८० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५२८८० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा भाव ४९२०० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५३७६० रुपये आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०४१० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५१४१० रुपये आहे. चांदीचा भाव एक किलोसाठी ६७५३० रुपये आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १९५२ डॉलर प्रती औंस आहे. चांदीचा भाव ०.९ टक्के घसरला असून तो प्रती औंस २७.३० डॉलर आहे. डॉलर इंडेक्समध्ये ०.२ टक्क्यांची घसरण झाली आहे. बुधवारी कमाॅडिटी बाजारात सोने ९०० रुपयांनी वधारले होते.

ऑगस्टमध्ये चांदी 13 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे

बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 52,173 रुपयांवरून घसरून 51,963 रुपयांवर गेले. या कालावधीत, सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 210 रुपयांनी खाली आले आणि त्याचवेळी मुंबईतील 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 50983.00 रुपयांवर आली.

Leave A Reply

Your email address will not be published.