सोने-चांदीच्या किमतींमध्ये वाढ ; वाचा ताजे दर

0

नवी दिल्ली: आज सोने-चांदीच्या किमतींमध्ये वाढ नोंदवली गेली. त्याच वेळी चांदीची किंमत वेगाने वाढली आहे. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर 10 ग्रॅम 46,411 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदी 67,009 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. विशेष म्हणजे आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत किंचित घट नोंदविण्यात आली, तर चांदीमध्ये फारसा बदल झाला नाही.

सोन्याचे नवीन दर :

गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत प्रति दहा ग्रॅम अवघ्या 61 रुपयांची वाढ झाली. राजधानी दिल्ली मध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची नवीन किंमत आता प्रति 10 ग्रॅम 46,472 रुपये झाली. यापूर्वी व्यापार सत्रात सोन्याच्या दर 10 ग्रॅम 46,411 रुपयांवर बंद झाला होता. त्याचबरोबर भारतीय बाजारपेठांऐवजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज प्रति औंस 1,777 डॉलरवर गेली.

चांदीचे नवीन दर :

आज चांदीच्या भावात जोरदार वाढ झाली. गुरुवारी दिल्लीत चांदीचे दर 1,776 रुपयांनी वाढून 68,785 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. यापूर्वी व्यापार सत्रात चांदी 67,009 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किमतीत आज कोणताही फरक नव्हता आणि ती 26.29 डॉलर औंसवर होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.