सोनाळे जि.प.शाळेला ग्रेडेड मुख्याध्यापक नसल्याने पालकांचा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा

0

जामनेर : – तालुक्यातील सोनाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रेडेड मुख्याध्यापक मिळणे बाबत शाळा व्यवस्थापन समिती,सरपंच ग्रामपंचायत सोनाळे व पालक यांनी गटशिक्षणाधिकारी जामनेर यांना निवेदन दिले आहे.या शाळेत इ.१ ते ७ वी पर्यंतचे वर्ग असून १८९ विद्यार्थी ज्ञान ग्रहण करीत आहेत.

तालुक्यातील उत्कृष्ट शाळा म्हणून या शाळेचा नाव लौकिक आहे शाळेची गुणवत्ता उत्तम आहे,भौतिक सुविधा सुद्धा परिपूर्ण आहेत व विद्यार्थी संख्या देखील लक्षणीय आहे या सर्व गोष्टी अनुकूल असताना या शाळेला संचालक मान्यतेत ग्रेडेड मुख्याध्यापकाचे पद नसून शाळेस पदवीधर शिक्षक सुद्धा नाही त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून यास सर्वस्वी शिक्षण विभाग जबाबदार आहे व आमच्या शाळेस लवकरात लवकर मुख्याध्यापक मिळावे अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती व सरपंच ग्रामपंचायत सोनाळे यांनी गटशिक्षणाधिकारी जामनेर यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे.मुख्याध्यापक न मिळाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा सुद्धा पालकांनी दिला आहे तरी शिक्षण विभाग जामनेर यांनी याकडे लक्ष द्यावे व मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा पालक वर्गातून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.