पाटणादेवी प्रतिष्ठानच्या चौकशीसाठी पाटणागावाचे ग्रामस्थ एकवटले

0

ग्रामस्थ करणार आत्मदहन

चाळीसगाव :- नयनरम्य पर्यटन स्थळ पाटणादेवी मंदिराचा वाद विकोपाला गेला असून पुजारी बाळकृष्ण जोशी यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी गेल्या नऊ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस असून प्रशासनाने कारवाई न केल्यास आत्मदहनाचा इशारा उपोषण ग्रामस्थ दीपक शिवाजीराव पाटील आणि आनंदराव भीमराव शेळके यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.

ननयनरम्य पर्यटन स्थळ पाटणादेवी हे सह्याद्रीच्या पर्वतरांगात गौताळा अभयारण्यात वसलेले आहे.या ठिकाणी आदिशक्ती चंडिका मातेचे हेमांडपंथी मंदिर आहे. येथे मोठी जत्रा भरते मंदिराची देखभाल दुरुस्तीचे काम पुरातत्त्व विभागाकडे आहे मात्र या ठिकाणी कौटुंबिक सदस्यांना एकत्र करून पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी प्रतिष्ठान  स्थापन केले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आलेल्या भाविकांच्या देणग्या स्वीकारल्या जातात त्याचा विनियोग मंदिराच्या विकासासाठी होत असताना दिसत नाही. शिवाय सालाना मंदिराच्या नावाने जमा झालेली मिळकत ट्रस्टच्या नावाने पुजारी बाळकृष्ण जोशी घशात घालत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी बाळकृष्ण जोशी यांचे विरोधात रणशिंग फुंकले आहे. बाळकृष्ण जोशी यांनी स्थापन केलेले पाटणा निवासिनी चंडीकादेवी प्रतिष्ठान पाटणा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या नावाने जोशी यांनी स्थापन केले आहे सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 सन 1950 चा मुंबई अधिनियम क्रमांक 29 अन्वये स्थापन करण्यात आलेली संस्था पहाता त्यात सदस्य मात्र अध्यक्ष म्हणून बाळकृष्ण पद्माकर जोशी उपाध्यक्ष यांच्या पत्नी नलिनी बाळकृष्ण जोशी सेक्रेटरी म्हणून मुलगा मनोज बाळकृष्ण जोशी, सहसचिव म्हणून किशोर बाळकृष्ण जोशी ,खजिनदार म्हणून राजश्री कमलेश जोशी अशा पाच सदस्यांची नावे प्रतिष्ठान मध्ये आहेत मात्र ही संस्था करण्यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्याच बरोबर गौताळा अभयारण्यात हे मंदिर आहे. आणि पुरातत्व विभाग देखरेख करीत असलेल्या या मंदिरात विश्वस्त मंडळ काम करत असल्याने संस्था स्थाप  करण्याआधी वनविभागाची देखील परवानगी घेणे अनिवार्य आहे.

मात्र व्यक्तिगत स्वार्थासाठी बाळकृष्ण जोशी यांनी बेकायदेशीररित्या प्रतिष्ठान स्थापन करून मंदिराला दान म्हणून मिळणारी मिळकत स्वतःच्या घशात घातल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या सर्व प्रकरणाची चौकशी ची मागणी ग्रामस्थांनी केली असून यासाठीच गेल्या नऊ दिवसापासून या ठिकाणी ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.

प्रशासनाकडून कुठलीही चौकशी नाही

कुठलीही कारवाई अद्याप प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आलेली नाही त्यामुळे व्यथित झालेल्या ग्रामस्थांनी आता आत्मदहनाचा इशारा दिला आहे पाटणादेवी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांची चौकशी करावी. बाळकृष्ण पद्माकर जोशी यांचे ट्रस्ट बाहेर काढण्यात यावे.अशी मागणी उपोषणकर्ते दीपक शिवाजीराव पाटील व आनंदराव भीमराव शेळके यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

पुरातत्व विभाग आणि धर्मादाय अधिकारी यांचा अहवाल आल्यावर कारवाई

घटना घटनास्थळाला तहसीलदार मोरे ,प्रांत शरद पवार  यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही ग्रामस्थांना त्यांनी दिली मात्र तरी देखील ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले नाही प्रशासकीय यंत्रणा वेळकाढूपणा करीत आहे झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यास तयार नाही बेकायदेशीर ट्रस्ट बरखास्त करण्याची कारवाई करण्यास तयार नाही त्यामुळे व्यथित झालेल्या ग्रामस्थांनी आत्मदहनाचा निर्णय घेतल्याची माहिती आनंदराव भीमराव शेळके यांनी दैनिक पुण्यनगरीला दिली तर याठिकाणी आम्ही स्वतःभेटी दिल्या आहेत बाळकृष्ण जोशी यांच्याकडे असलेले ताम्रपत्र त्याचबरोबर प्रतिष्ठानची कागदपत्रे पडताळून पाहण्यासाठी पुरातत्व विभाग व धर्मादाय अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत  त्यांच्या चौकशीनंतरच यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी अशी माहिती  तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.