सॉफ्टवेअरमध्ये बदल केल्याने तरूणीवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील एका खासगी कोचींग क्लासमधील सॉफ्टवेअरमध्ये बदल करून फसवणूक केल्याप्रकरणी एका तरूणीवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासगी क्लासेसचा डाटा कॉपी करुन सॉफ्टवेअरमध्ये परस्पर बदल करुन फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल देवेंद्र चढ्ढा (वय ५०, रा. विशाल कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जून २०१६ ते २०१७ दरम्यान दीपाली दीपक भदाणे यांनी चढ्ढा यांच्या खासगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांची यादी इतर व्यक्तींना मेलद्वारे पुरवली. क्लास मॅनेजमेंट व ओएमआर या सॉफ्टवेअरमध्ये परस्पर बदल करुन फसवणूक केली. अशी फिर्याद चढ्ढा यांनी दिली आहे.

सदर फिर्यादीच्या अनुषंगाने दीपाली भदाणे यांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.