सेनेच्या विभागप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी

0

 सोशल मीडियातील पोस्टचा राग अनावर : पाचोऱ्यात माजी नगरसेवक अमोल शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल

पाचोरा (प्रतिनिधी) :  कुऱ्हाड खुर्द तालुका पाचोरा येथील शिवसेनेच्या विभाग भ्रमणध्वनी द्वारे प्रमुखास जीने मारण्याची धमकी देऊन त्यांच्या पत्नी (कुटूंबास) लज्जा उत्पन्न होईल असे संभाषण केल्या प्रकरणी अमोल पंडितराव शिंदे यांचे विरुद्ध पिंपळगाव हरे पोलिस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कुऱ्हाड येथील तान्हाजी युवराज पाटील हे शिवसेनेचे विभागप्रमुख असून विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदार किशोर पाटील यांचा सक्रिय प्रचार केला त्यात आमदार किशोर पाटील हे विजयी झाले तर अमोल शिंदे हे पराभूत झाले याचे वाईट वाटल्याने शिंदे यांनी भ्रमणध्वनी द्वारे तुमच्या फॉमिलीला घेऊन मला तुमच्या फॉमिली सोबत पर्यटनाला जायचे आहे,मी तुला धमकी देत आहे असे समजून तुझ्या दयेमायेची अपेक्षा ठेवू नको, जिथे कोठे माझ्या मार्गात अडवा आला तेथे तूला संपविला ही माझी धमकीच आहे. अशा आशयाचे संभाषण केल्याने तान्हाजी पाटील यांनी अमोल शिंदे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत अॅड. अभय पाटील यांनी सायंकाळी सहा वाजता येथील शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषदेत घेतली,या वेळी अॅड. दिनकर देवरे शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, तान्हाजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक राजपूत, उद्धव मराठे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत माहिती देतांना अँड अभय पाटील यांनी सांगितले की गेल्या आठवड्यात आंबे वडगांव येथे १४ वित्त आयोगातून ग्रामपंचायतीच्या विकास कामांचे उद्घाटन अमोल शिंदे यांचे हस्ते झाले होते, यांवर तान्हाजी पाटील यांनी सोशल मिडिया वर पोष्ट टाकून आम्ही जन्माला घातलेल्या बाळाच्या बारशाला कुणी येवू नये अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर अमोल शिंदे यांनी दिनांक २४ रोजी रात्री पावणे आटला तान्हाजी पाटील यांचे भ्रमणध्वनी द्वारे संभाषण केले होते त्यावेळी तान्हाजी पाटील यांचा फोनचा स्पिकर अॉन होता व रेकार्डिंगही सुरू होते या सदरचे संभाषण पाटील यांच्या संपुर्ण कुटुंबीयांनी ऐकले या बाबत तान्हाजी पाटील यांनी २५ रोजी पिंपळगाव (हरे.) पोलीसात तक्रार दिली होती मात्र पोलिसांनी दिनांक २६ रोजी सायंकाळी चार वाजता गुन्हा नोंदविला, गुन्हा उशिरा दाखल केल्याने पोलीसांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी ही अभय पाटील यांनी केली आहे,व तान्हाजी पाटील हे एकटे नसून त्यांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना आहे असेही अँड अभय पाटील यांनी सांगितले .

राजकीय द्वेशातूनच – अमोल शिंदे 

मी आॅडीयो क्लिपमधे कोणत्याही प्रकारची शिवीगाळ केलेली नसून तान्हाजी पाटील यांनी टाकलेल्या पोष्ट विषयी विचारणा केली होती,माझा विधानसभा निवडणुकीत थोड्या मताने पराभव झाल्याने सदरचा प्रकार राजकीय द्वेशापोटी सुरू असल्याचे अमोल शिंदे यांनी ”दैनिक लोकशाही”च्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.