चाळीसगावात नागरिकत्व संशोधन कायदाच्या समर्थनार्थ मोर्चा

0

चाळीसगाव :– चाळीसगाव तालुक्यातील  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय सुरक्षा मंच यांचे वतीने* CAA समर्थन महामोर्चा आयोजित करण्यात आला होता, राष्ट्राची एकता, अखंडता अबाधित राहण्यासाठी हा कायदा अत्यंत गरजेचा असून रेल्वे स्टेशन ते तहसील कार्यालय या मार्गाने निघालेल्या शांततापूर्वक व शिस्तबद्ध अश्या मोर्च्यामध्ये विद्यार्थी, महिला, व्यापारी, सर्व स्तरातील नागरिक, राजकीय, सामाजिक आदी विविध क्षेत्रातील राष्ट्रप्रेमी सहभागी झाले होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार श्री मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांकडून चिथावणी देत आंदोलन घडवून आणले जात आहे. या विधेयकात कुणावरही अन्याय होणार नाही, हा कायदा कुठल्याही जातीच्या, धर्माच्या अथवा संविधानाच्या विरोधात नाही.

या कायद्यात बाहेरच्या देशातील धार्मिक कारणामुळे अत्याचार झालेल्या त्या देशातील अल्पसंख्याक नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मोदी सरकारने घेतलेले निर्णय देशहिताचेच आहे. जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा कमी केला. तेथील ३७० कलम काढून जम्मू काश्मिर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली.

देशाच्या इतिहासातील असे अनेक प्रश्न आहेत जे मागील ७० वर्षांपासून प्रलंबित आहेत त्यांना मार्गी लावण्याचे काम मोदी सरकार करत आहे. एक भारतीय म्हणून आपण संयमाने वागणे गरजेचे आहे.

म्हणून या कायद्याच्या समर्थनार्थ जनजागृतीसाठी हा शांततापूर्ण मार्गाने मोर्चा अभाविप आणि राष्ट्रीय सुरक्षा मंच तर्फे काढण्यात आला आहे . असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले,

या मोर्चात खासदार उन्मेष पाटील, जळगाव जिल्हा भाजपचे अध्यक्ष संजीव पाटील,नगराध्यक्ष सौ आशाताई चव्हाण, पंचायत समितीच्या सभापती सौ स्तितल बोरसे, मार्केट कमिटी चे सभापती सरदार सिंग राजपूत, नगरसेवक राजेंद्र चौधरी, उपसभापती संजय पाटील,भा ज पा तालुका अध्यक्ष के बी सांळुखे  अरूण पाटील, संजय चौधरी, घृष्णेश्वर पाटील, विवेक जोशी,आदी सहभागी होते

यावेळी चाळीसगाव चे निवासी नायब तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले,

Leave A Reply

Your email address will not be published.