सेंद्रिय शेती हीच शाश्वत शेती- मनोजकुमार सैंदाणे यांचे प्रतिपादन

0

चाळीसगाव:-(प्रतिनिधी) येथील बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स अँड के. के. सी. कॉमर्स महाविद्यालतील भूगोल विभाग तसेच आय. क्यु. ए. सी॰ (IQAC ) “हवामान बदल व त्याचा कृषि क्षेत्रावर होणारा परिणाम” या विषयावर राज्यस्तरीय एकदिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात राज्यातील विविध भागातील १५७ शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवला.

बदलते हवामान, मान्सून पर्जन्य यांचा शेतीवर होणारा परिणाम अतिशय चिंतेचा विषय आहे. जागतिक तापमान वाढ आणि वातावरणात क्लोरोफ्लोरोकार्बन यांचे वाढणारे प्रमाण याचा खोलवर प्रभाव शेतीवर होत आहे त्यासाठी शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून येणार्‍या आव्हांनाना सामोरे जावे असे प्रतिपादन वेबिनारचे आयोजक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी केले. उप-प्राचार्य  तसेच आय. क्यु. ए. सी. चे समन्वयक डॉ. अजय काटे यांनी आपल्या मनोगतात शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्यामुळे तो जगला तर मानव प्राणी जगेल त्यासाठी शेतकर्‍यांसाठी शेतीविषयक प्रबोधनपर कार्यक्रम होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. भूगोल विभाग प्रमुख डॉ. विजय बाविस्कर यांनी प्रस्तुत वेबिनार आयोजित करण्याचा उद्देश व विभागातर्फे वर्षभरात आयोजित केले जाणारे विविध उपक्रम याविषयी सखोल माहिती दिली.

प्रस्तुत वेबिनार साठी मनोजकुमार सैंदाणे (कृषी पर्यवेक्षक, चाळीसगाव) यांनी आपल्या मनोगतात ऋतुचक्र, एल-निनोचा प्रभाव भारतीय उपखंडातील मान्सूनवर कसा होतो तसेच शेतकर्‍यांनी माती परीक्षण, आंतरपीक पद्धती, रुंद- वरंबा व सरी पद्धत, गारपीट, नगदी पिके, दुग्ध शेती व सरकारी धोरण याविषयी पॉवर पॉइंट द्वारे सविस्तर मार्गदर्शन केले.

भूगोल विभाग प्रमुख डॉ. विजय बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, डॉ. व्ही. डी. चौधरी सूत्रसंचालन तर प्रा. किशोर पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले. सदर वेबिनारच्या यशस्वीतेसाठी व श्री. रघुनाथ खलाल यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.