चाळीसगाव येथील अमरधाम येथे नवीन शववाहिनीची अद्यापही प्रतिक्षा

0

चाळीसगाव(प्रतिनिधी) : शहरातील खरजई रोड  येथील सर्वात मोठी असलेल्या अमरधाम हया स्मशान भूमितील शववाहिन्या  हया पूर्णपणे जीर्ण होऊन मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे अंतिम विधी करण्यासाठी  आलेल्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यांची दुरूस्ती किंवा नवीन शववाहिनी बसविण्यात याव्यात म्हणून अनिल भाऊ  चौधरी(ठाकरे )यांनी आंदोलनाचा इशारा पालिका प्रशासनाला दिला होता.

त्यानंतर पालिका प्रशासनाने हया समस्याबाबत त्वरित दखल घेत लवकरचं अमरधाम येथे नवीन शववाहिनी बसविण्यात येईल असे आश्वासन त्यांना देण्यात आले  होते.मात्र  एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी ओलंडल्या नंतर देखील शववाहिनीची समस्या जैसे थै असून अद्यापही तेथील शववाहिनीची दुरूस्ती किंवा नवीन शववाहिनी बसविण्यात आल्या नाहीत.त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.शववाहिनी बसविण्याबाबत नगरपालिकेच्या वतीने निवीदा देखील प्रसिध्द करण्यात आली होती.

त्यामुळे हा प्रश्न लवकरचं निकाली निघेल अशी आशा शहरवासियांकडून व्यक्त केली जात होती . निविदा निघून एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असून  देखील  शववाहिनीचे काम मार्गी लागले नाही .नागरिकांनी आणखी किती दिवस त्रास सहन करावयाचा असा संतप्त सवाल तेली समाज युवामंचचे अध्यक्ष अनिल भाऊ ठाकरे यांनी उपस्थित केला असून नगरपालिका प्रशासनाच्या संथ कारभाराविरोधात त्यांनी संताप व्यक्त करत येत्या 10 दिवसात अमरधाम येथील शववाहिनींचा प्रश्न मार्गी लागला नाही तर लोकशाही मार्गाने नगरपालिका प्रशासनाच्या .विरोधात नागरिकांना सोबत घेऊन उपोषण केले जाईल असा इशाराही अनिल भाऊ चौधरी( ठाकरे )यांनी निवेदनाद्रारे दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.