किन्ही शिवारात लाखो रूपयांची हातभट्टी दारू केली नष्ट ; तालुका पोलिसांची क़ामगिरी

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  भुसावळ तालुक्यातील किन्ही शिवारात अवैधरित्या सुरु असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर तालुका पोलिसांनी  २० जून रविवार रोजी  अचानक  धाड टाकून लाखों रूपयांची दारू व कच्चे रसायन नष्ट केले . पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली .

किन्ही शिवारात नितीन चौधरी याच्या शेताजवळ नाल्यात सार्वजनिक जागी संशयित आरोपी  अन्सार रशीद गवळी  रा.कन्हाळा हा गावठी हातभट्टीची दारू गाळण्याचीे भटटी रचुन जळत्या चुलीवर हातभटटीची दारू गांंळतानां गूळ , मोह , नवसागर मिश्रित द्रव्य कच्चे  व गरम रसायनचे 12 ड्रम त्यात 2300 लिटर रसायण व गावठी हटभट्टीची 60 लिटर तयार दारू असे ड्रम सह अंदाजे किंमत 91900 /- रु चे मालासह मिळुन आल्याने त्याचे  विरुद्ध प्रोव्ही कायदा अन्वये कलम 65 फ, ब, क, ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार ,सपोनि रुपाली चव्हाण,  साफौ सुनील चौधरी , पोहेकाँ विठ्ठल फुसे, संदीप बडगे,  गणेश राठोड , उमेश बारी ,होमगार्ड उमेश सोनवणे ,  अमोल जयकर ,  जगदीश पाटील , पोलीस पाटील  रेवसिंग पाटील , राजेंद्र तायडे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.