सुरत पॅसेंजरसह बांद्रा एक्स्प्रेस भादली व धरणगावातून सुटली

0

12 मेलसह एक्स्प्रेस गाड्या धावल्या विलंबाने

भुसावळ (भुसावळ)- भादली ते जळगाव या दरम्यान असलेल्या तिसर्या लाईनीसाठी स्टील गर्डर टाकरण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून मंगळवारी करण्यासाठी सकाळी 9.10 ते दुपारी 1.10 असा चार तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने सुरत पॅसेंजर व बांद्रा खान्देश एक्स्प्रेस या गाड्या पाळधी व धरणगाव स्थानकावरून सोडण्यात आल्यात तर अप-डाऊन मार्गावरील तब्बल 12 एक्स्प्रेस व मेल सुपरफास्ट गाड्यांना विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्याने प्रवासी त्रस्त झाले.

12 गाड्या धावल्या विलंबाने

मंगळवारी भादली ते जळगाव दरम्यान ब्लॉक घेण्यात आला. सकाळी 9.10 ते दुपारी 1.10 असा चार तासांचा पॉवर ब्लॉक आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आल्याने अप-डाऊन मार्गावरील दोन्ही बाजूच्या गाड्या यामुळे प्रभावीत झाल्या. ुंबईकडून येणार्या रेल्वे गाड्या या संबंधित रेल्वे स्थानकांवर वेळेवर आल्यावरही त्यांना जळगावकडे कमी वेगात आणण्यात आले. अप-डाऊन मार्गावरील तब्बल 12 गाड्या या भुसावळ विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्यात. यामुळे या गाडीतील प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.