प्रधानमंत्री घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांची घरकुले तात्काळ सुरू करा

1

युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

बोदवड (प्रतिनिधी) ;- तालुक्यातील प्रलंबित असलेले प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांची घरकुले तात्काळ सुरू करण्यात यावीत अशा मागणीचे निवेदन युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांनी गटविकास अधिकारी यांना दिले. देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गेल्या दिड वर्षांपासून तालुक्यातील प्रधानमंत्री घरकुल योजनेतील पात्र लाभार्थी घरकुल लाभाच्या प्रतिक्षेत आहेत.

तालुक्यातील घरकुल ‘ब’

यादी पुर्ण झालेली असून ‘ड’ यादी ग्रामसभेचा ठराव घेऊन आँनलाईन करून ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कागदपत्रे,ठरवून दिलेले निकष पूर्ण करीत ग्रामपंचायतीने पंचायत समिती स्तरावर कागदपत्रे सपुर्द केले आहेत.तरी सुध्दा आजपर्यंत कुठल्याही प्रकारची घरकुले सुरू झाली नसल्याची वस्तुस्थिती आहे.तरी तालुक्यातील प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेच्या ‘ड’ यादीला मंजुरी देऊन तात्काळ घरकुले सुरू करण्यात यावेत.येत्या काही दिवसांत हा विषय मार्गी न लागल्यास जिल्हा युवक काँग्रेस तर्फे पंचायती समितीवर धडक मोर्चा काढण्यात येईल व होणा-या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन खोडके,विचवा सरपंच जितू तायडे,शिवसेनेचे विक्री शर्मा, शिवाजी ढोले,शिवसेनेचे दिपक माळी आदी उपस्थित होते.

1 Comment
  1. Pavan Dyanadev Dhamadhere says

    तळवेल

    ता भुसावल
    जि जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.