सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना नोटीस

0

बारामती,लोकशाही न्यूज नेटवर्क –
तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच बारामती लोकसभा मतदार संघातील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. उमेदवारांनी दाखविलेल्या खर्चात आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील शॅडो रजिस्ट्रर खर्चात तफावत आढळून आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्याकडून ही नोटिस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरताना संपत्तीची सगळी माहिती देणं आवश्यक असतं. मात्र उमेदवारांनी दाखविलेल्या खर्चात आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील शॅडो रजिस्ट्रर खर्चात तफावत आढळली आहे. याप्रकरणी त्यांना नोटिस बजावण्यात आली असून ही तफावत आढळण्यामागचे कारण काय? याबाबत पुढच्या 48 तासांत खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांचा 28 एप्रिलपर्यंतचा 37 लाख 23 हजार 610 रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र, उमेदवारांच्या खर्च प्रतिनिधीने दाखविलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी शॅडो रजिस्टरशी तुलना केली. त्यावेळी त्यात 1 लाख तीन हजार 449 रुपयांची तफावत आढळल्याचे नोटीसमध्ये उल्लेख आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.