सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला अटक

0

मुंबई :- ‘मैने प्यार किया’ चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री भाग्यश्रीचा पती हिमालय दासानीला मुंबई पोलिसांनी मंगळवारी अटक केली. जुगाराचा अड्डा चालवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. दरम्यान, हिमालयची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

अंधेरी पश्चिमच्या लोखंडवाला परिसरात पोकरच्या नावाखाली जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत १८ जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील चौकशीत एकूण २६ जणांना अद्याप अटक करण्यात आली असून दसानी याचाही त्यात सहभाग असल्याचे उघड झाल्यावर त्यालाही अटक करण्यात आली आहे. अंधेरीतील आंबोली पोलिसांनी मंगळवारी ही कारवाई केली. दासानीला न्यायालयात हजर करण्यात आले असता जामीन मंजूर झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.