सुखद बातमी : राज्यात 1 लाख जणांची करोनावर मात

0

मुंबई: करोना काळात एक सुखद बातमी समोर आली आहे. राज्यात मागील 24 तासांमध्ये 8 हजार 18 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील 1 लाख 1 हजार 172 रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.21 टक्के झाले आहे. दरम्यान आज राज्यात 6 हजार 330 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात मागील 24 तासांमध्ये 125 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.