सीएएला विरोध पडला महागात; भाजप नेत्यावर पक्षाची मोठी कारवाई

0

मुंबई – देशात एकीकडे नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाला आहे तर दुसरीकडे याविरोधात जोरदार निदर्शने चालू आहेत. तर काही राज्यांनी सीएएला विरोध करणारे ठराव संमत केले आहेत. असाच ठराव परभणी नगरपरिषदेत मंजूर केल्याच्या कारणावरून भाजपने दोन मोठ्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातील पालम व सेलू नगरपरिषदेत  सीएएच्या विरोधात ठराव मांडण्यात आला. पालम नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष असलेले भाजपचे बाळासाहेब गणेश रोकडे व सेलू नगरपरिषदेत नगराध्यक्ष असलेले विनोद हरीभाऊ बोराडे यांनीही यावर आक्षेप घेतला नाही. याउलट ठरावाला मंजुरी दिली. याची गंभीर दखल घेत भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.