साेनिया-पवारांच्या भेटीनंतर आज सत्तास्थापनेचा पेच सुटणार?

0

नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांचे अाघाडी सरकार स्थापन हाेण्याच्या हालचालींना अाता वेग अाला अाहे. शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. आज ते काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे.  यावेळी सत्ता वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत देखील रविवारीच दिल्लीला पोहचले आहेत. त्यामुळे दिल्लीतील घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढ्याबाबत चर्चेसाठी नुकतीच राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी मोदीबागेत ही बैठक झाली. राष्ट्रवादीच्या या बैठकीत जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. पुण्यात झालेल्या या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. याबाबत काँग्रेसशी बोलून चर्चा करु असा निर्णय झाल्याचंही सांगण्यात आलं.

दरम्यान आज शरद पवार आणि सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मंगळवारी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल, असंही राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. त्यामुळे महासेनाआघाडीबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.