शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

0

नवी दिल्ली : देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बोबडे यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. १७ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झालेले सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

न्यायमुर्ती बोबडे सध्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांना सरन्यायाधीश म्हणून 18 महिन्यांचा वेळ मिळेल. ते 23 एप्रिल 2021 रोजी निवृत्त होतील. सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारणारे न्या. बोबडे हे तिसरे महाराष्ट्रीय ठरले आहेत. 18 नोव्हेंबर 2019 ते 23 एप्रिल 2021 असा त्यांचा कार्यकाळ असेल. पुण्याचे जस्टीस यशवंत विष्णू चंद्रचूड (16 वे सरन्यायाधीश) हे पहिले महाराष्ट्रीय सरन्यायाधीश होते.

दरम्यान, माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 3 ऑक्टोबर 2018 रोजी सरन्यायाधीशपदी नियुक्त झाले होते. ते रविवारी (17 नोव्हेंबर) निवृत्त झाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.