साहेब…माफ करा, राजकारण करण्यासाठी पैसे नाही ; नांदेडमधील मनसे शहराध्यक्षाची आत्महत्या

0

नांदेड : अखेरचा जय महाराष्ट्र, यापुढे राजकारण करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही असं सांगून नांदेडमधील २७ वर्षीय मनसेच्या शहराध्यक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सुनिल ईरावार असे या आत्महत्या करणाऱ्या शहराध्यक्षाचे नाव आहे. दरम्यान या सुनिलने आत्महत्येपूर्वी एक सुसाई़ड नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये त्याने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागितली.

सुनिल ईरावार हा शहरातील गोकुंदा परिसरात राहत होता.
सुनिल हा राज ठाकरे यांचा कट्टर चाहता होता. त्यामुळेच तो मनसेत सहभागी झाली होता. बघता बघता तो शहराध्यक्षही झाला. आज सकाळी साडे सहाच्या सुमारास सुनिलने राहत्या घरात साडीच्या कपड्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनिलने आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घरातील सदस्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुनिलचा मृतदेह ताब्यात घेतला. घराची पाहणी केली असता सुनिलने आत्महत्येपूर्वी एक सुसाई़ड नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये त्याने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागितली.

सुनिलची सुसाईट नोट वाचून शहरातील मनसे कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. सुनिलने आत्महत्या केल्यामुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या प्रकरणीत आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.