जळगाव जिल्ह्यात कोरोनाने मोडले आतापर्यंत सर्व रेकार्ड ; पाहा धडकी भरवणारी आकडेवारी

0

जळगाव (प्रतिनीधी) जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आज उद्रेक झाल्याचे आकड्यांवरुन समोर आले. आज दिवसभरात जिल्ह्यात विक्रमी ६०१ रुग्णांची नोंद झाली. त्यात सर्वाधिक रुग्ण 129 रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८ हजार २९७ इतकी झाली आहे. आज दिवसभरात 12 कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे 343 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.

असे आढळले रूग्ण
जळगाव शहर 129, जळगाव ग्रामीण 68, भुसावळ 13, अमळनेर 82 , चोपडा 41, पाचोरा 23 , भडगाव 27 , धरणगाव 29, यावल 8, एरंडोल 42, जामनेर 4 , रावेर 9, पारोळा 32, चाळीसगाव 57, मुक्ताईनगर 21, बोदवड 12 व इतर जिल्ह्यातील 4 अशी रूग्ण संख्या आहे.

दरम्यान, आज दिवसभरात 12 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात भुसावळ तालुक्यात 3, चाळीसगाव, अमळनेर तालुक्यात प्रत्येकी 2 व मुक्ताईनगर, चोपडा, पाचोरा धरणगाव आणि जळगाव शहरातील प्रत्येकी एका बाधित रुग्णांचा समावेश आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.