जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे.आज सलग सहाव्या दिवशी जिल्ह्यात ५०० हुन अधिक रूग्ण आढळून आले आहे. जिल्हा प्रशासनाला आज सायंकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये तब्बल ५६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात सर्वाधीक १३८ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल अमळनेर-५९ व चोपडा-५८ रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १७ हजार ६९६
जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा विचार केला असता रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे. जळगाव ग्रामीण-३८; भुसावळ-२६; पाचोरा-५; भडगाव-५०; धरणगाव-२९; यावल-१९; एरंडोल-२९; जामनेर-११; रावेर-६; पारोळा-३२; चाळीसगाव-३८; मुक्ताईनगर-१३; बोदवड-३ व बाहेरच्या जिल्ह्यातील दोन रूग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आज ३७३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आजवर या विषाणूला हरविणार्या रूग्णांचा आकडा १२ हजारांच्या पार गेला आहे. आज दिवस अखेरीस एकूण १२१०१ रूग्ण बरे झाले आहेत. तर आज दिवसभरात तीन मृत्यू झाले असून आजवरच्या मृतांची संख्या ६५० इतकी झाली आहे.