सावळदबारा येथे ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकांवर प्रादुर्भ

0

सोयगाव – सावळदबारा व तालुक्यासह परिसरात सध्या तुरीचे पिक बहरले असून, हरभराही चांगल्या स्थितीत आहे. मात्र दोन दोन दिवसांपासुन सावळदबारा,सोयगाव परिसरात ढगाळ वातावरण असल्याने या पिकांवर रोग पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकर्‍यांमधे चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

पिंकावर आळ्यानां प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकर्‍यांनी वर्तवली आहे. तसेच फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढणार असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

सध्या स्थितीतील पाने कुरतड-याने अळीचा तूर पिकांवर प्रादुर्भाव झाला असून, धुक्यामुळे फुलांची गळती होत असल्याने शेतकरी चिंतीत आहेत. दोन दिवसाआड वातावरणात बदल होत असल्याने तुरीचे पिक संकटात आले आहे. ढगाळ वातावरणामुळे व धुक्यामुळे फुल गळती,पाने कुरतडणारे किटक वाढले आहे.

हवामानाचा परिणाम

अचानक हवामान बदलून ढगाळ वातावरणामुळे सध्या बहरात आलेली तूर हातची जाण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी फुलांची मोठ्या प्रमाणात गळती होण्यास प्रारंभ झाला आहे. तसेच अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची सुरुवात झाली आहे. सध्या शेतकरी कापूस वेचणीच्या कामात व्यस्त असल्याने परिसर हरभरा व मक्का पिकावरील आळ्यांचा प्रादुर्भाव चांगलाच झाला आहे. या करीता कृषी विभागाने शेतकर्‍यांना बांधावर शेतकर्‍यांला योग्य ते मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी शे.आरिफ शे.लुखमान व परिसरातील शेतकरी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.