मौलाना आझाद फाऊंडेशनच्यावतीने अल्पसंख्याक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना 50 पाटी-पेन्सील चे वाटप

0

जळगांव – शिक्षण ही मुलभुत गरज असुन शिक्षणासाठी शासन सर्वोत्परी मदतही करत आहे. परंतु आजही अनेक शाळामधील गोरगरीब आणी गरजु मूलांना शिक्षण घेत असतांना अनेक अडचनींना सामना करावा लागत आहे. सोबतच पाट्या, वह्या, पेन आदी शैक्षणीक साहित्याच्या अभावी शिक्षण घेण्यात अडथळा येत आहे.

त्यामुळे मौलाना आझाद फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख यांच्या संकल्पनेतून आज अल्पसंख्याक दिनानिमित्त शहरातील तांबापूर भागातील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणीक साहित्याची मदत व्हावी व मुलांना लेखन वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीकोनातुन एक पाटी-पेन्सील हा ऊपक्रम राबविला. तसेच इतरांनीही सामाजीक ॠण फेडन्यासाठी नवनविन संकल्पना राबवून आणी अनाठाई पैसे खर्च न करता गरजु आणी गोरगरीबांसाठी कल्याणकारी ऊपक्रम राबवण्याची गरज आहे, असे यावेळी संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख बोलताना म्हणाले.

यावेळी अंगणवाडी सेविका मीना परदेशी, मदतनीस कमल वाणी, चेतन निंबोळकर, महेबूब शेख आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांचा मार्गदर्शनाने हा उपक्रम राबविण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.