साकळी प्रा. आरोग्य केंद्रांतर्गत सयुंक्त कुष्ठरोग शोध व क्षयरोग मोहिम सुरु

0

यावल

महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाकडुन  आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन  सयुंक्त कुष्ठरोग  शोध अभियान व सक्रीय  क्षयरुग्ण शोध मोहीम अंतर्गत  असंसर्गजन्यरोग जागरुता अभियान  मोहिमेच्या अनुषंगाने तालुक्यात  १ जुलै  ते ३१ आँक्टोबंर २०२१ या कालावधीत त्वचारोग व कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत साकळी  प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्रातील   वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत संशयीत रुग्णांचे मोफत निदान व उपचार केले जातील, या मोहिमेचा तालुक्यातील जनतेने लाभ घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे   व साकळी येथील डॉ. सागर पाटील यांनी केले

यात त्वचारोग व कृष्ठरोग शोध मोहिमेत  ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक यांचे पथक प्रत्येक घरोघरी जाऊन कृष्ठरोगाबाबत माहिती देऊन घरातील सर्व सदस्यांची तपासणी करणार आहेत. सर्व्हेक्षणादरम्यान संशयीत रुग्ण आढळल्यास त्याचे मोफत निदान व उपचार करण्यात येणार आहे. या मोहिमेत लोकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन संपुर्ण कुटूंबाची तपासणी करण्यासाठी योगदान द्यावे.

या मोहिमेचे सुक्ष्म नियोजन आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आले असून ग्रामीण भागात  पथकांची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे. प्रत्येक गावनिहाय कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आशा स्वंयमसेविका  व आरोग्य सेवक  घरोघरी जावून घरातील सर्व सदस्यांची फिक्कट लालसर न खाजवणारा,  न दुखणाऱ्या बधीर चट्टयाची तपासणी करणार आहेत. पर्यवेक्षक या मोहिमेवर देखरेख ठेवणार असून बाधीत रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयात मोफत निदान व उपचार करण्यात येणार आहेत.

त्वचारोग व कुष्ठरोगावर वेळीच उपचार घेतल्यास तो बरा होत असल्यामुळे समाजामध्ये या रोगाविषयी असलेले समज गैरसमज बाजूला सारुन संशयीत रुग्णांनी या मोहिमेचा लाभ घेत तात्काळ निदान व उपचार घेतल्यास रोगप्रसाराला आळा बसू शकेल. तालुक्यातून अशा रोगांना हद्दपार करण्यासाठी व निरोगी जीवन जगण्यासाठी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा,  असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेंमत बऱ्हाटे  यांनी केले आहे.

साकळी  प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक  राजेश्वर निकुंभ, संदिप पाटील, आरोग्य सेविका सविता कोळी, सविता चौधरी, गटप्रर्वतक चित्रा जावळे, लीना पाटील, आशा  स्वयंसेविका रंजना कोळी, संगीता कोळी परीश्रम घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.