सवप महाविद्यालय ऐनपूर येथे विज्ञान दिवस साजरा

0

निंभोरा बु ता.रावेर :- येथून जवळच ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र मंडळ आणि विज्ञान मंडळ तर्फे विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातिला पदार्थ विज्ञान शास्त्राचे शास्ज्ञ सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करूण व दीप प्रज्वलन केले. प्रमुख वक्ते म्हणून प्रा.एच.एम.बाविस्कर व प्रा.डाँ. डी.बी.पाटील उपस्थित होते.

त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान दिन विषयी सविस्तर माहिती सांगितली व विविध शंकांचे निरसन करूण विज्ञानाचे फायदे व वापर विषयी सविस्तर माहीती दिली. अध्यक्षीय समारोपात मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी नोबेल पारितोषिक मिळवलेले भौतिकशास्त्र विषयाचे प्रा. सी.व्ही.रमन यांनी केलेल्या संशोधन कार्याविषयी माहिती दिली विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून जिद्द व चिकाटी ने प्रयत्न करून तुमचे ध्येय तूम्ही गाठू शकाल असे सांगितले. या कार्यक्रमला प्रा. सुनील आर.इंगळे, सिनेट सदस्य प्रा.डाँ. के.जी.कोल्हे, उपप्राचार्य डाँ. पी.आर.महाजन, प्रा.डाँ. एस.ए.पाटील, प्रा.एस.बी.पाटील, प्रा.एस.बी.महाजन, प्रा. दिलीप सोनावणे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतिश वैष्णव, तर आभारप्रदर्शन प्रा.डाँ. जे.पी.नेहेते यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी प्राध्यापक वृंद  आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.