आसोदा गेट ते ममुराबाद रस्ता वापरण्यास रेल्वेची मूभा

0

लोकप्रतिनिधींनी केली होती मागणी; रेल्वेच्या पाहणीनंतर निर्णय

जळगाव दि. 28-
शिवाजीनगर रेल्वे पुलाला पर्यायी म्हणून उपयोगात आणता येवू शकणार्‍या असोदा गेट ते ममुराबाद रस्त्याच्या वापरास गुरुवारी रेल्वे प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली.
महानगरपालिकेचे महापौर सिमा भोळे, उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, नगरसेवक सुनिल खडके, नवनाथ दारकुंडे, चेतन सनकत आदींसह उपायुक्त चंद्रकांत खोसे, शहर अभियंता सुनिल भोळे यांनी सदर रस्त्याची बुधवारी दुपारी पाहणी केली होती. असोदा रेल्वे गेट व ममुराबाद रस्त्याचा काही भाग हा रेल्वेच्या अखत्यारीत असल्याने सदरचा रस्ता दुरुस्ती व वापरासाठी रेल्वे विभागाची परवानगी बुधवारीच उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे उपायुक्त चंद्रकांत खोसे, शहर अभियंता सुनिल भोळे यांनी भुसावळ येथे जावून डीआरएम यादव यांची भेट घेवून असोदा गेट ते ममुराबाद रस्ता ममुराबाद पुलाचे काम होईस्तोवर वापरु द्या, अशी मागणी केली होती.
आजपासून कामाला सुरुवात
रेल्वे डीआरएम कार्यालयाचे मुख्य अभियंता राहूल अग्रवाल व अभियंता जी.पी. पाटील यांनी गुरुवारी सकाळी 11 वा. असोदा गेट ते ममुराबाद रस्त्याची पाहणी केली. पाहणी अंती रेल्वेच्या अखत्यारीतील रस्त्याची दुरुस्ती रेल्वे विभागाने करावयाची आहे. तर मनपाच्या अखत्यारीतील रस्ता मनपा प्रशासन दुरुस्त करणार आहे. आजपासून रेल्वे व मनपा प्रशासनाकडून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. रस्त्यावरील रेल्वेचे साहित्य, प्रॉपर्टी उचलून घेण्यात येणार आहे. मनपा प्रशासनाकडून ममुराबाद रस्त्याची डागडुजी करण्यात येणार आहे. रस्त्यावरील खड्डे खडी व मुरुम टाकून जेसीबीच्या मदतीने बुजवून घेण्यात येणार आहे. रस्तादुरुस्तीच्या कामानंतर सदर रस्ता 18 मीटरचा होवून वापरायोग्य होणार आहे.
लेंडीनाला पुल दुरुस्तीला दोन महिने
शिवाजी नगर पुलाला पर्याय असलेला लेंडी नाल्यावरील ममुराबाद पुलाचे काम सुरु आहे. पुलाच्या कामाला दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. पावसाच्या पाण्यामुळे पुलाला पूर येत होता. त्यामुळे पावसाळ्यात वाहतुक थांबवावी लागत असे. त्याला पर्याय म्हणून मनपातर्फे हा पुल उंच करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सदर पुल दोन महिन्यानंतर वापरायोग्य होणार असल्याचे प्रशासनातील अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे शिवाजीनगर, जुने जळगाव, ममुराबाद व ग्रामीण भागातील परिसरातील वाहनधारकांची सोय होणार आहे. मात्र दुरुस्ती सुरु असल्याने तेथील वाहतुक पुर्णत: बंद आहे. पुन्हा त्याला पर्याय म्हणून असोदा रेल्वे गेट ते ममुराबाद रस्ता आहे. मात्र रेल्वेच्या साहित्याची त्यात अडचण आहे. तसेच ममुराबाद रस्त्यावर बर्‍याच ठिकाणी मोठे खड्डे आहेत. या पर्यायी रस्त्यामुळे नागरिकांसह जुन्या गावातील दीडशे शेतकर्‍यांच्या बैलगाड्यांचा प्रश्न मिटणार आहे. साहित्य उचलण्यासह दुरुस्तीच्या कामाला आज सुरुवात होणार आहे. ममुराबाद पुलाचे काम शक्य तितक्या लवकर उरकण्याचे आदेश महापौरांनी बुधवारीच दिले आहे.
शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या जोड रस्त्याच्या कामाला सुरुवात
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विकासकांच्या उपस्थितीत पुलाच्या जोडरस्त्याच्या कामाला गुरुवारी दुपारी सुरुवात करण्यात आली.
शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या भुमीपूजनानंतर दि.25 रोजी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या मधोमध असलेल्या भागाचे काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. गुरुवारी दुपारी पत्र्या हनुमान चौकापासून पुलाच्या पायथ्याशी जोडरस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी.पाटील, सह अभियंता सुभाष राऊत व इतर अधिकारी आणि विकासकांचे अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, पर्यायी मार्ग नसल्याने तहसिल कार्यालयाजवळून रेल्वे रुळांवरुन शेकडो आबालवृद्ध पादचारी जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.