आश्रय फाऊंडेशन व रूग्णकल्याण समितीतर्फे रूग्णांनाची मोफत मोतीबिंदू तपासणी

0

यावल । यावलआश्रय फाऊंडेशन व ग्रामिण रूग्णालयातील रूग्णकल्याण समितीच्या संयुक्त विद्यमाने १३ फेब्रुवारीला पार पडलेल्या मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रीया शिबीरातील रूग्णांना गुरूवारी (दि.२८) ग्रामिण रूग्णालयात पुर्नतपासणी करून शस्त्रक्रीये करीता जळगाव नेण्यात आले आहे.

शिबीराततील २४ व ग्रामिण रूग्णालयातील ६ अशा ३० रूग्णांवर मोफत शस्त्रक्रीया होईल. तर पुन्हा १३ मार्च रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रीया शिबीर होणार आहे.
शहरातील आई हॉस्पिटल शेजारी यावल-रावेर मधील डॉक्टरांच्या आश्रय फाऊंडेशन व ग्रामिण रूग्णालयातील रूग्णकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ फेब्रुवारीला मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले होते. या शिबीरात १०५ रूग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली होती तर त्यातील २४ रूग्ण शस्त्रक्रीयेेस पात्र ठरले होते. तेव्हा या रूग्णांवर बुधवारी ग्रामिण रूग्णालयात डॉ. शुभम जगताप यांनी प्राथमिक तपासणी करीत रक्तदाब, शुगर आदींची तपासणी करीत गुरूवारी ग्रामिण रूगणालयात सर्व रूग्णांना सकाळी १० वाजेला बोलावण्यात आले येथे फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, नेत्र चिकित्सक अधिकारी एम. एस. चौधरी, लॅब टेक्निशन नानासाहेब घोडके, सुर्यकांत पाटील, डॉ. शुभम जगताप, मनोज बारी आदींची उपस्थिती सर्व रूग्णांवर मोफत शस्त्रक्रीये करीता जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात नेण्यात आले आहे.या सर्व रूग्णांवर शस्त्रक्रीया पार पडल्यावर त्यांना पुन्हा यावल रूग्णालयात पोहचण्यात येईल.

१३ रोजी पुन्हा शिबीर

शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आई हॉस्पिटल शेजारी येत्या १३ मार्च रोजी पुन्हा मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रीया शिबीर घेतले जाणार आहे तेव्हा तालुक्यातील नागरीकांनी त्याचा लाभ घ्या असे अवाहन करण्यात आले असुन नाव नोंदणी करीता शुभम देशमुख, भुषण फेगडे, स्नेहल फिरके, रितेश बारी, मनोज बारी यांच्याशी संपर्क साधावा असे अवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.