सलग बाराव्या दिवशी पेट्रोल, डिझेलची दरवाढ ; जाणून आजचा दर

0

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यां आज गुरुवारी सलग १२ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. आज पेट्रोलच्या दरात ५३ पैसे व डिझेलच्या दरात ६४ पैशांनी वाढ झाली आहे. यामुळे आज मुंबईत पेट्रोल ८४.६५ रुपये प्रति लिटर व डिझेल ७४.९१ रुपये प्रति लिटर झाले आहे. तर, दिल्लीत पेट्रोलचे दर ७७ रुपये ८१ पैसे, तर डिझेलचे दर ७६ रुपये ४३ पैसे झाले आहेत.  या अगोदर बुधवारी पेट्रोलच्या दरात दिल्लीत ५५ पैशांची तर डिझेलच्या दरात ६९ पैशांची वाढ करण्यात आली होती.

देशातील प्रमुख शहरांपैकी  चेन्नईत पेट्रोल -८१.३२ रुपये प्रति लिटर व डिझेल ७४.२३ लिटर आहे. याचबरोबर कोलकातामध्ये पेट्रोल ७९.५९ रुपये व डिझेल ७१.९६ रुपये लिटर आज झाले आहे.

सलग १२ दिवसात पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर सरासरी ६.५ ते ७ रुपयांनी वाढवले आहेत. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपन्यांनी मंगळवारी विमान इंधनाच्या दरात देखील १६ टक्के वाढ केली. यामुळे दिल्लीत जेट फ्युएल ३९०६९.८७ रुपये किलो लीटर झाले आहे. यामुळे विमान तिकिटाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात येतो. तसंच सकाळी सहा वाजल्यापासूनच हे नवे दर लागूही करण्यात येतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्युटी, डिलर कमीशन आणि अन्य बाबींचा समावेश केल्यानंतर याचे दर जवळपास दुप्पट होतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.